cotton variety मित्रांनो नमस्कार, तुमच्यासाठी फार महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे. मित्रांनो सध्या पावसाचं वातावरण हे अगदी पेरणी करिता योग्य होत चाललेला आहे. आता पंजाब डख त्याच्याबरोबर हवामान विभागांनी देखील पावसाचा संदर्भात अनेक अंदाज जारी केले आहेत. आता या संदर्भात शेतकरी कापूस लागवड असेल किंवा अन्य लागवडी असेल याकडे वळत आहेत.
कापसाची लागवड या ठिकाणी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केली जाते, आणि यातच आता शेतकरी कोणते कापसाचे बियाणे योग्य आहे हा त्यासाठी कोणते खते योग्य आहेत हे देखील या ठिकाणी माहिती घेत आहे. जे एकरी चांगले उत्पादन देते तेही कमी दिवसांमध्ये अशा भरघोस उत्पन्न देणाऱ्या कापसाचे वाण याची माहिती जाणून घेणार आहोत.
cotton variety कापसाच्या नवीन जातीचे बियाणे का निवडावे…?
या ठिकाणी जर पाहायला गेलं तर कृषी क्षेत्रातील तज्ञांच्या माहितीनुसार परंपरागत जाती वारंवार लावण्यापेक्षा नवीन संशोधीत जातीचा वापर करणे आधीक फायदेशीर ठरतो. ज्यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता असते हवामान अनुकूलता, उत्पादन क्षमता या सर्व गोष्टीचे बाब ठेऊन या ठिकाणी नवीन जातींची याठिकाणी संशोधित केले जाते.
आता या ठिकाणी पाहायला गेलं तर बाजारातील प्रमुख नवीन जाती कोणते आहे हे आपण या ठिकाणी समजून घेण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत. याची माहिती तुम्हाला नवीन जातीची नाव आणि उत्पादन हे खाली दिलेला आहे.
श्रीराम बायो सीड्स 6001
ही बायोसिड्स श्रीराम कंपनीच्या असून ही जात अनेक ठिकाणी चांगले उत्पादन देते. याची काही खास वैशिष्ट्ये बोंडे साखळीत लागतात. मध्यम आकाराची बोंड असतात, लवकर काढणी 140 ते 150 दिवसांमध्ये होते. बोंड अळीचा प्रादुर्भापासून बचाव याठिकाणी केला जातो.
श्रीराम बायोसिड्स SRCH 639 BG II
ही जात जास्त करून खानदेश या विभागात लोकप्रिय आहेत. मोठ्या आकाराच्या टपोरे बोंडे या ठिकाणी असते. साखळीत वाढ होते 140 ते 150 दिवसांचे परिपक्व होते, आणि चांगलं उत्पादन क्षमता देखील देते.
रासी सीड्स स्विफ्ट आरसीएच 911 बीजी II
गेल्या काही वर्षापासून बाजारात प्रसिद्ध असलेले वाण आहे. साखळीत बोंडे येतात मध्यम आकार आहे, 150 ते 160 दिवसांमध्ये काढणी व्हायला सुरुवात होते.
रासी सीड्स RCH 797 BG II
हे वाण मध्य प्रदेश, गुजरात, आणि तेलंगाना, तामिळनाडूमध्ये यशस्वी होतो. 150 ते 160 या दिवसांमध्ये परिवृत्त होतो. विविध हवामानात अनुकूल होतो.
टाटा दिग्गज एमसी 5408
हा या ठिकाणी देखील चांगला आहे. उत्तर भारतात प्रसिद्ध असलेली जात आहे, हरियाणा, व उत्तरेकडील राज्यांमध्ये लोकप्रिय हे चांगले उत्पादन क्षमता मिळते.
कापूस वाण निवडताना विचार करून व सर्व बाबी देखील माहिती असणे गरजेचे आहे. मातीचा प्रकार कोणता आहे काळी, लाल, किंवा वाळू मिश्रन मातीनुसार जातीची निवड करणे आवश्यक आहे. पाण्याची उपलब्धता तुमच्याकडे कसे आहे, त्याचा हवामानाने पाऊस आहे हे देखील सर्व पाहणं गरजेचं असतं.
आर्थिक स्थिती बियाण्याची किमती कृषी अनुदान कर्ज आणि अपेक्षित नफा याचा तुलनात्मक अभ्यास करणे आवश्यक असतं. ज्या काही तज्ञांनी दिलेल्या बियाण्यांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रासाठी या देखील तुम्हाला पाहण्याचा तर अशा पद्धतीची माहिती होते.
या सर्व बियाण्यांची माहिती आपण थोडक्यात आणि कोणतीही आवडती थेट बियाणे खरेदी करू नये. इतर कोणत्या नुकसानीसाठी वेबसाईट व लेखक जबाबदार राहत नाही धन्यवाद.