Maharashtra Shashan Nokari 2025 कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये काम करण्याची इच्छा बाळगणाऱ्या युवकांसाठी ही एक उत्तम आणि स्थिर नोकरीची संधी आहे. महानगरपालिकेने गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील एकूण 490 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे.
ही भरती विविध सेवांमध्ये करण्यात येणार असून, प्रशासन, लेखा, अभियांत्रिकी, अग्निशमन, वैद्यकीय, क्रीडा व उद्यान सेवा यांचा समावेश आहे. तुमच्याकडे जर आवश्यक पात्रता असेल आणि शासकीय क्षेत्रात करिअर घडवायचं स्वप्न असेल, तर ही भरती तुमच्यासाठीच आहे.
भरतीची ठळक वैशिष्ट्ये:
एकूण जागा: 490
पदाचे प्रकार: गट ‘क’ आणि गट ‘ड’
भरतीचा प्रकार: सरळसेवा
शेवटची तारीख: 3 जुलै 2025
अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन
कोणकोणत्या पदांसाठी संधी?
या भरतीमध्ये खालील प्रकारची पदं भरली जाणार आहेत:
- लिपिक-टंकलेखक
- अग्निशामक (फायरमन)
- नर्स
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- एक्स-रे तंत्रज्ञ
- व इतर तांत्रिक व प्रशासकीय पदे
शैक्षणिक पात्रता:
- अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असावा.
- काही पदांसाठी तांत्रिक किंवा व्यावसायिक प्रशिक्षणाची अर्हता देखील आवश्यक आहे.
- संपूर्ण पात्रतेसाठी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख:
- उमेदवारांनी 03 जुलै 2025 पूर्वी आपला ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचे आहे.
- शेवटच्या क्षणी सर्व्हर डाऊन अथवा तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी लवकर अर्ज करा.
अर्ज फी:
प्रवर्ग | शुल्क |
---|---|
खुला | ₹1000/- |
मागास / अनाथ | ₹900/- |
वयोमर्यादा:
- उमेदवाराचे वय 18 ते 43 वर्षांदरम्यान असावे.
- मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयात सवलत लागू असेल.
नोकरीचे ठिकाण:
या भरतीअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. शहरी व्यवस्थापन आणि सार्वजनिक सेवांमध्ये योगदान देण्याची संधी यातून मिळणार आहे.
पगारश्रेणी:
- निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार ₹15,000/- ते ₹1,22,800/- पर्यंतचे मासिक वेतन मिळणार आहे.
- यासोबत राज्य सरकारच्या नियमानुसार इतर शासकीय भत्त्यांचा देखील लाभ मिळेल.
अर्ज कसा करावा?
- खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिकृत वेबसाईटवर जा.
- आपली सर्व माहिती अचूक भरून आवश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करा.
- अर्ज भरल्यानंतर फी भरून अर्ज सबमिट करा.
- अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |