PM Kisan Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. या योजनेद्वारे केंद्र सरकारकडून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी तीन समान हप्त्यांमध्ये एकूण ₹6000 मदत देण्यात येते. आतापर्यंत या योजनेचे 19 हप्ते वितरित करण्यात आले असून, आता 20वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची शक्यता आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 17 जुलै 2025 पूर्वी शेतकऱ्यांनी काही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. कारण अशी माहिती पुढे येत आहे की 18 जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील मोतीहारी येथे एका जनसभेला संबोधित करताना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता वितरित करू शकतात. त्यामुळे वेळेत पुढील कामं पूर्ण करणं गरजेचं ठरणार आहे.
कोणती कामं करावीत 17 जुलैपूर्वी?
ई-केवायसी पूर्ण करा:
शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया आता अनिवार्य करण्यात आली आहे. ती pmkisan.gov.in या पोर्टलवर ऑनलाइन करता येते किंवा जवळच्या CSC केंद्रावर जाऊन ती पार पाडता येते. ई-केवायसी न झाल्यास हप्ता अडकू शकतो.
आधार क्रमांक बँक खात्याशी जोडा:
जर आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल, तर हप्ता थेट खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे तत्काळ बँकेत जाऊन आधार लिंक करणे गरजेचे आहे.
बँक तपशील पुन्हा तपासा:
खाते क्रमांक, IFSC कोड, किंवा तुमच्या नावातील चूकही तुमचं ₹2000 चं नुकसान करू शकते. त्यामुळे सर्व बँक माहिती बरोबर आहे का, ते खात्री करून घ्या.
भू-संपत्ती संबंधित नोंदी अपडेट करा:
तुमचं जमीन संबंधित तपशील राज्य पोर्टलवर किंवा CSC सेंटरवर जाऊन अपडेट करून घ्या, कारण अपूर्ण नोंदीही अडचण निर्माण करू शकतात.
मोबाईल क्रमांक अपडेट ठेवा:
OTP व इतर आवश्यक सूचना शेतकऱ्यांच्या मोबाईलवरच पाठवल्या जातात. त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर योग्य आणि चालू स्थितीत असणे आवश्यक आहे.
लाभार्थी स्थिती तपासा:
pmkisan.gov.in या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन “बेनिफिशियरी स्टेटस” विभागात तुमचा मोबाईल नंबर किंवा नोंदणी क्रमांक टाकून हप्त्याची स्थिती तपासता येते.
वेळेत हप्ता मिळवायचा असेल तर…
वरील सर्व प्रक्रिया 17 जुलैपूर्वी पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. यामुळे 2000 रुपयांचा हप्ता वेळेवर आणि खात्यात जमा होण्याची शक्यता अधिक असते. ही रक्कम अनेक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असून, सरकारची ही मदत वेळेवर मिळणं आवश्यक आहे.
Disclaimer
वरील माहिती ही विविध माध्यमांतून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. यामध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. कृपया अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in यावर भेट देऊन किंवा स्थानिक CSC केंद्राशी संपर्क साधून अधिकृत माहितीची खातरजमा करून घ्या.