Vehicle good news वाहन धारकांना आनंदाची बातमी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केली ही मोठी घोषणा

On: Friday, June 20, 2025 3:21 PM
Vehicle good news

Vehicle good news आज आपण जाणून घेणार आहोत वाहनधारकांसाठी आलेली एक अत्यंत आनंदाची बातमी. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

या निर्णयामुळे अनेकांना टोल संदर्भातील त्रासापासून दिलासा मिळणार आहे. विशेषतः गाडी असलेल्या नागरिकांसाठी ही बातमी मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. चला तर जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.

Vehicle good news वाहनधारकांसाठी मोठी खुशखबर

ज्यांच्याकडे कार, जीप किंवा व्हॅनसारखी खासगी (बिगरव्यावसायिक) वाहने आहेत, त्यांच्यासाठी ही मोठी अपडेट आहे. याआधीही इलेक्ट्रिक वाहनधारकांना टोल माफ करण्याचा निर्णय झाला होता. आता टोल संदर्भात आणखी एक मोठी योजना केंद्र सरकारकडून सादर करण्यात आली आहे.

वार्षिक पास योजनेची घोषणा

नितीन गडकरी यांनी जाहीर केलेल्या नव्या योजनेनुसार, १५ ऑगस्ट २०२५ पासून देशभरातील बिगरव्यावसायिक वाहनांसाठी ₹3,000 किमतीचा फास्टॅग आधारित वार्षिक टोल पास उपलब्ध होणार आहे. या पासचा उपयोग मिळाल्याच्या तारखेपासून पुढील एक वर्ष किंवा २०० टोल प्रवासांपर्यंत करता येणार आहे.

कुठे आणि कसे मिळणार हा पास?

लवकरच NHAI (भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि राजमार्ग यात्रा अ‍ॅपवर यासाठी वेगळी लिंक उपलब्ध होणार आहे. याद्वारे नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने पास खरेदी करता येणार आहे. हा पास देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर लागू असणार आहे.

सरकारचा निर्णय का?

सरकारच्या म्हणण्यानुसार, ६० किलोमीटरच्या अंतरावर वारंवार टोल भरावा लागतो आणि यामुळे वाहनचालकांना अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर टोल नाक्यांवरील गर्दी कमी करणं, प्रवास अधिक सुलभ करणं आणि वाहनधारकांना टोलच्या झंझटीतून थोडीशी मुक्तता मिळवून देणं, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.

वाहनधारकांना काय फायदा होईल?

  • वेळेची बचत होईल
  • टोल नाक्यावर होणारी गर्दी आणि वाद कमी होतील
  • वारंवार टोल भरण्याची गरज राहणार नाही
  • ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे सुलभ सेवा

या योजनेमुळे देशातील लाखो वाहनधारकांना मोठा फायदा होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. सरकारच्या या पावलामुळे खासगी वाहनधारकांसाठी टोल संदर्भातील अडचणी दूर होणार आहेत.

Leave a Comment