Cast certificate online शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती, सरकारी योजना किंवा नोकरीतील आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल, तर सर्वात महत्त्वाचं दस्तऐवज म्हणजे जात प्रमाणपत्र. अगदी शालेय प्रवेशापासून ते राजकीय उमेदवारीपर्यंत अनेक ठिकाणी याची आवश्यकता भासते. त्यामुळे जात प्रमाणपत्र मिळवणं हे महत्त्वाचं ठरतं. आज आपण घराबसल्या जातीचा दाखला ऑनलाइन कसा काढायचा याबद्दल सविस्तर आणि सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत.
Cast certificate online जातीचा दाखला का आवश्यक आहे?
शिष्यवृत्ती, फी सवलत, प्रवेशामध्ये आरक्षित जागा
शासकीय नोकरीसाठी आरक्षणाचा लाभ
राज्य किंवा केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ
निवडणूक उमेदवारीसाठी आवश्यक कागदपत्र
या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक असते. विशेषतः मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागास प्रवर्गांसाठी हे दस्तऐवज अत्यंत उपयुक्त ठरते.
जातीचा दाखला कुठे मिळतो?
दोन पर्याय:
- ऑफलाइन अर्ज – नजीकच्या तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात जाऊन.
- ऑनलाइन अर्ज – महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत आपले सरकार पोर्टलवरून.
➡️ वेबसाईट: https://aaplesarkar.mahaonline.gov.in
जातीचा दाखला मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रे
1. ओळख दर्शवणारी कागदपत्रे (कोणतेही एक)
आधार कार्ड
पॅन कार्ड
पासपोर्ट
मतदान कार्ड
ड्रायव्हिंग लायसन्स
मनरेगा कार्ड
शासकीय ओळखपत्र
2. पत्ता दर्शवणारी कागदपत्रे (कोणतेही एक)
- रेशन कार्ड
- वीज बिल / पाणी बिल
- घरफाळा पावती
- सातबारा / 8 अ उतारा
- आधार / मतदार कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
3. जातीचा पुरावा असलेली कागदपत्रे
अर्जदार, वडील किंवा आजोबांची शाळा प्रवेश नोंदवहीची प्रत
शाळा सोडल्याचा दाखला
वडीलांचा जन्म दाखला
शासकीय नोकरीची सेवा पुस्तिका ज्यामध्ये जात नमूद आहे
जात पडताळणी समितीचे प्रमाणपत्र
ग्रामपंचायत किंवा महसूल खात्याच्या नोंदी
1950 पूर्वीच्या काळातील निवास पुरावा
4. वंशावळी व शपथपत्र (जर वडिलांचे जात प्रमाणपत्र उपलब्ध नसेल)
जवळच्या नातेवाईकाचे जात प्रमाणपत्र
नात्याचा तपशील दर्शवणारे वंशावळी शपथपत्र
5. स्वघोषणापत्र (Self Declaration)
- अर्जासोबत हे शपथपत्र जोडणे अनिवार्य आहे.
आपले सरकार पोर्टलवर अर्ज कसा करावा?
https://aaplesarkar.mahaonline.gov.in या वेबसाइटला भेट द्या.
नवीन वापरकर्ता म्हणून नोंदणी करा – नाव, मोबाईल नंबर व ईमेल टाका.
लॉगिन करा व ‘महसूल विभाग’ निवडा.
पुढे ‘महसूल सेवा’ > ‘जात प्रमाणपत्र’ पर्याय निवडा.
अर्ज फॉर्ममध्ये वैयक्तिक माहिती, पत्ता, राहत असलेला कालावधी भरा.
आवश्यक कागदपत्रे 75KB ते 500KB मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी अपलोड करा.
अर्ज सादर करा व अर्ज फी ऑनलाइन भरून पावती जतन करा.
जात प्रमाणपत्र किती दिवसात मिळते?
- जर सर्व माहिती योग्य आणि कागदपत्रे अपलोड केलेली असतील, तर साधारणतः 21 दिवसांत जात प्रमाणपत्र मिळते.
- जर या कालावधीत तुम्हाला प्रमाणपत्र मिळालं नाही, तर 15 दिवसांनंतर वेबसाइटवरून अपील अर्ज करता येतो.
काही महत्त्वाचे मुद्दे:
अर्ज करताना सर्व कागदपत्रे स्पष्ट व योग्य प्रकारे अपलोड करणे गरजेचे आहे.
कोणतंही कागदपत्र नसेल, तर पर्यायी कागदपत्रांची यादी सेतू कार्यालय किंवा वेबसाइटवर दिली आहे.
तुमचं अर्जाचं स्टेटस नियमितपणे तपासा.
तुमचा मोबाईल नंबर अपडेट ठेवा – कारण अपडेट्स SMS द्वारे येतात.