Ladki Bahin Yojana List मित्रांनो नमस्कार, मुख्यमंत्री माझी लडकी बहिणी योजनेत नवीन समोर येत आहे. मंत्री तटकरे यांनी या संदर्भात काही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोणत्या महिला या ठिकाणी ₹1500 रुपये पासून वंचित राहणार आहेत.
हप्ते कोणाचे बंद होणार..? याची सविस्तर माहिती आज या लेखाचे माध्यमातून आपण जाणून घेण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचायचा, आणि आपल्या बांधवांना शेअर नक्की करा.
Ladki Bahin Yojana List कोणत्या बहिणींचे पैसे बंद होणार…?
कोणत्या लाडक्या बहिणींचे पैसे हे बंद होऊ शकतात…? काय या संदर्भातील नवीन नियम लागू करण्यात आले आहेत, याची सविस्तर माहिती या ठिकाणी पण जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये बंद होणार असल्याची माहिती समोर मिळते आहे.
राज्य सरकारची महत्त्वाकांशी ही माझी लाडकी बहीण योजना आहे. या ठिकाणी अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी अनधिकृतपणे अपात्र असून सुद्धा लाभ घेतलेला आहे. अशा प्रमाणात महिलांची संख्या मोठी असून राज्य सरकारने आता अर्जाची व्यापक पुनर् तपासणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना योजनेचा लाभ
राज्यातील ही आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी ही योजना कल्याणकारी सुरू केलेली आहे. यात वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये आहेत, त्यांना या योजनेचा लाभ म्हणून महिलांना पंधराशे रुपयेचा लाभ दरमहा देण्यात येतोय.
या ठिकाणी योजना सुरू करताना सरकारने स्पष्ट करण्यात आली होती की सरकारी कर्मचारी महिला त्याचबरोबर जास्त उत्पन्न असणाऱ्या, चार चाकी वाहन मालकीच्या असणाऱ्या किंवा मालमत्ता असणारे कुटुंबातील महिलांना लाभ घेता येत नाही, हे स्पष्ट केले होते.
कोणत्या लाडक्या बहिण योजनेतून बाहेर…?
तरी देखील महिला अनेक या ठिकाणी लाभ घेतल्याचे दिसून येत आहे. बाल विकास मंत्री तटकरे यांनी अलीकडेच जाहीर केलेल्या माहितीनुसार लाभार्थ्यांची तपासणी दरम्यान राज्यभरातील 2652 सरकारी महिला या ठिकाणी अनधिकृतपणे सदर योजनेचा पंधराशे रुपये लाभ घेत आहेत.
ऑगस्ट 2024 ते एप्रिल 2025 पर्यंत ₹13,500 चा लाभ घेतला असल्याचा देखील सांगण्यात येत आहे. राज्यभरातील 1 लाख 20 हजार सरकारी महिला कर्मचाऱ्यांचे अर्जाची तपासणी करण्यात आलेली आहे. आणि युआयडी म्हणजेच आधार कार्ड द्वारे देखील क्रॉस वेरिफिकेशन करण्यात आलेला आहे. या प्रक्रियेमध्ये एकूण 2289 महिला या ठिकाणी कर्मचारी असल्याचे दिसून येत आहे.
आर्थिक परिणाम आणि वसुलीची कारवाई
आर्थिक परिणाम आणि वसुलीची कारवाई देखील होणार असल्याची माहिती मिळते आहे. लाभ घेणाऱ्या अनधिकृत महिला सरकारी कर्मचाऱ्यांकडून आता 3 कोटी 58 लाख रुपयाची वसुली करणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे.
कोणत्या कर्मचारी महिलांचे हफ्ते बंद होणार…?
या ठिकाणी पाहायला गेलो तर वर्ग 3 वर्ग 4 मधील सरकारी महिला कर्मचाऱ्यांचा देखील यामध्ये समावेश आहे. नमो शेतकरी योजनेचे लाभ घेणाऱ्या 7 लाखांच्या वर महिलांना योजनेतून वगळण्यात आले असल्याची देखील माहिती आहे.
अशा पद्धतीने या ठिकाणी ही माहिती समोर येत आहे, पात्रता आणि निकषित तुम्हाला माहीतच असेल. आता लाडक्या बहिणींना मे आणि जून दोन्ही महिन्याच्या हप्ते सध्या स्थगित आहे. मे आणि जून महिन्याचे पैसे या ठिकाणी लवकरच महिलांना मिळू शकतात अशी माहिती समोर येत आहे.